
अशिया खंडातील आणि मुंबई (Mumbai) शहरातील सर्वात दाटीवाटीचा परीसर अशी ओळख असेल्या धारावी (Dharavi) झोपडपट्टी परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus ) संक्रमितांची एक अंकी किंवा शून्य असलेली संख्या आज (8 मार्च) अचानक दोन अंकी झाली. आज दिवसभरात धारावीमध्ये COVID-19 संक्रमित 18 रुग्ण आढलले. गेल्या काही दिवसातील आकडेवारीत गाठलेला हा उच्चांक आहे. बीएमसी (BMC) ने याबाबत माहिती दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, धारावी परिसरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण हे 4,166 च्याही वर गेले आहे. यावर्षी 26 फेब्रुवारी रोजी धारावीत कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळले होते. धारावी परिसरात गेल्यावर्षी 1 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर पुढील रुग्ण साधारण 20 दिवसांनी सापडला होता. त्यानंतर या भागाचा कोरोना उद्रेक झाल्यावर 25 डिसेंबर या दिवशी पहिल्यांदाच या परिसरातील नव्याने रुग्ण सापडण्याची संख्या शून्यावर पोहोचली. 25 डिसेंबर या दिवशी या परिसरात एकही कोरोना रुग्ण सापडला नव्हता. (हेही वाचा, Coronavirus in Mumbai: मुंबई शहरात आज सायंकाळी 6 पर्यंत 1008 जणांना कोरोना संक्रमण, 956 जणांना डिस्चार्ज- बीएमसी)
मुंबई महापालिका प्रभागातील एका अधिकााऱ्याने सांगितले की, कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याचे कारण असे की, महापालिकेने पुन्हा एकदा जोरदारपणे तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तसेच, नागरिकही म्हणावे त्या प्रमाणात काळजी घेताना दिसत नाहीत.
केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हळूहळू शिथील केला. त्यामुळे बंद असलेल्या सेवा पूर्ववत सुरु झाल्या. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात पुन्हा वाढू लागली आहे. कोरोना लसीकरणासही सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही त्याला म्हणावी तशी गती प्राप्त झाली नाही. त्यामुळे कोरोनासोबतची लढाई केंद्र आणि राज्य सरकारससह सर्वसामान्य नागरिकांना काहीशी बॅकफूटवरच खेळावी लागत असल्याचे चित्र आहे.