Coronavirus in Mumbai: मुंबई शहरात आज सायंकाळी 6 पर्यंत 1008 जणांना कोरोना संक्रमण, 956 जणांना डिस्चार्ज- बीएमसी
मुंबई शहरात उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 93% इतकी आहे. साधारण 1 मार्च ते 07 मार्च 2021 अखेर मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.31% इतका राहिला आहे. 07 मार्च 2021 पर्यंत शहरात एकूण 34,34,610 इतक्या कोरोना चाचण्या झाल्या. मंबई शहरातील कोरोना रुग्णवाढीच्या दुप्पटीचा दर 225 दिवसांवर गेला आहे.
मुंबई शहरात आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1008 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले. तर 956 जणांना डिस्चार्ज मिळाला. संपूर्ण दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 इतकी असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. दरम्यान, ही माहिती देताना मुंबई महापालिकेने म्हटले आहे की, मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी 3 रुग्ण पुरुष तर एक महिला रुग्ण होती. त्यापैकी 3 रुग्णांना प्रदीर्घ काळापासून काही आजार होते. तसेच चौघांचेही वय 60 वर्षांहून अधिक होते.
दरम्यान, मुंबई शहरात उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 93% इतकी आहे. साधारण 1 मार्च ते 07 मार्च 2021 अखेर मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.31% इतका राहिला आहे. 07 मार्च 2021 पर्यंत शहरात एकूण 34,34,610 इतक्या कोरोना चाचण्या झाल्या. मंबई शहरातील कोरोना रुग्णवाढीच्या दुप्पटीचा दर 225 दिवसांवर गेला आहे.
शहरात आतापर्यंत झोपडपट्या आणि चाळी अशा मिळून सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या 20 इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे सीलबंद केलेल्या चाळींची संख्या 193 इतकी आहे. 24 तासांमध्ये रुग्णांच्या सानिध्यात आलेल्यांचा शोध घेतलेल्यांची संख्या 6,078 इतकी आहे. तर सध्या CCCI मधील भर्ती 477 इतकी आहे. CCCI मधील रुग्ण हे अति जोखीम प्रकारात येतात. (हेही वाचा, Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला नाही तर लादण्यात येऊ शकतो अंशिक Lockdown; पालकमंत्री असलम शेख यांचे संकेत)
८ मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/rRYIeLQlYh
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 8, 2021
केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हळूहळू शिथील केला. त्यामुळे बंद असलेल्या सेवा पूर्ववत सुरु झाल्या. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात पुन्हा वाढू लागली आहे. कोरोना लसीकरणासही सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही त्याला म्हणावी तशी गती प्राप्त झाली नाही. त्यामुळे कोरोनासोबतची लढाई केंद्र आणि राज्य सरकारससह सर्वसामान्य नागरिकांना काहीशी बॅकफूटवरच खेळावी लागत असल्याचे चित्र आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2021 08:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

