मुंबई (Mumbai) शहरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC ) प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, शहरातील वाढती कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या पाहता सर्व शासकीय रुग्णालये आणि कोविड सेंटर्समधील बेड भरले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेतले जाणार आहेत किंवा राखीव ठेवले जाणार आहेत. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठांकडून प्रभाग अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे असे की, जर एखाद्या खासगी रुग्णालयाने विरोध केला तर पुढील कारवाईसाठी पोलिसांची मदत घेण्याचे आदेशही या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संक्रमितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयं आणि आवश्यक प्रमाणात बेड उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यानुसार संभाव्य प्रकाराला सामोरे जाण्यासाठी काही काळजी घेतली जात आहे. दरम्यान, साथरोग नियंत्रणासाठी 80:20 नियमानुसार सर्वाधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार खासगी रुग्णालयांमधील एकूण क्षमतेच्या 80% बेड ताब्यात किंवा आरक्षीत करण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालय प्रशासन हे 20% बेड्सबाबत त्यांचे ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. (हेही वाचा, Coronavirus: Frozen Food पासून COVID-19 विषाणूची उत्पत्ती? WHO अहवाल काय सांगतोय पाहा)
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकात म्हटले आहे की, लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन राहता येणार नाही त्यांना बेड उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच, ज्या रुग्णांना फारसा त्रास नाही अथवा अत्यावश्यक उपचारांची अवश्यकता नाही (Asymptomatic Covid Patients ) अशा रुग्णांना तातडने डिस्चार्ज द्यावा आणि अत्यावश्यक उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध करुन द्यावा. authorities.