महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान आता राज्यात आज कोरोनाचे आणखी 19,218 रुग्ण आढळून आले असून 387 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनासंक्रमितांचा आकडा 8,63,062 वर पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत 6,25,773 जणांची प्रकृती सुधारली असून 2,10,978 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचसोबत आतापर्यंत 25,964 जणांनी कोरोना व्हायरसमुळे आपली जीव गमावला आहे.
कोरोनाची परिस्थिती अधिक भयंकर होऊ नये म्हणून वेळोवेळी सरकारकडून उपययोजना केल्या जात आहे. तसेच कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी सुद्धा लॉकडाऊनचे आदेश दिले गेले जात आहेत. परंतु राज्यात सध्या अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये ई-पास आवश्यक नसणार असून नागरिकांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु अद्याप सरकारने मंदिरे, जिम, धार्मिक स्थळ आणि मेट्रो सेवा बंद ठेवली आहे.(Nana Patole Tested Positive For Coronavirus: महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या 2 दिवस आधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना विषाणूची लागण; प्रकृती उत्तम असल्याची माहिती)
378 deaths and 19,218 new cases detected in the state today. The total number of positive cases in the state is 8,63,062 including 6,25,773 recovered patients, 2,10,978 active cases and 25,964 deaths: Maharashtra Health Department pic.twitter.com/GRU8kcXytI
— ANI (@ANI) September 4, 2020
दरम्यान,राज्यात सद्य घडीला 2 लाख 5 हजार 428 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर महाराष्ट्रातील मृत्यूदर 3.03% इतका झाला आहे. तर राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह पनवेल आणि औरंगाबाद येथे कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे कोरोनाच्या या हॉटस्पॉट ठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच कोविड19 च्या रुग्णांवर जगभरातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी अहोरात्र उपचार करत आहेत. ऐवढेच नाही तर कोविड योद्धे सुद्धा कोरोनाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.