महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज मागील 24 तासात राज्यात 553 नवे कोरोनाबाधित वाढल्याची माहिती समोर आली आहे. तर दिवसभरात 19 कोरोनाबाधितांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकदा 5229 वर पोहचला आहे. तर एकूण कोरोना बळींचा आकडा 251 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबई शहरामध्ये आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूरमध्येही कोरोनाबाधितांची संख्या दिवसगणिक वाढत असल्याने आता नागरिकांमध्ये कोरोना व्हायरस बाबत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; ताजे अपडेट एका क्लिकवर.
महाराष्ट्रातील मुंबईमध्ये वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता आता केंद्रानेही एक विशेष पथक मुंबईत पाठवले आहे. याच्याद्वारा वरळी, धारावी सारख्या हॉट्स्पॉटची माहिती घेतली जाणार आहे. तर धारावीतील कोरोनाबाधितांना आटोक्यात ठेवण्यासाठी HCQ औषधाचाही वापर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. धारावीत 150 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तर पुणे, पिंपरी चिंचवडसह सारा पुणे जिल्हा सील करण्यात आला आहे. येथे संचारबंदी कडक करत नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी केवळ दोन तासांची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात 53 वर्षीय COVID-19 बाधित रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 55 वर.
553 new #COVID19 positive cases reported in the last 24 hours in Maharashtra as the total number of positive cases in the state stands at 5229. 19 more deaths were recorded in the last 24 hours as the total death in the state rises to 251: Public Health Dept, Govt of Maharashtra
— ANI (@ANI) April 22, 2020
वेळेवर पीक कापणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल ; शेती करुन काय फायदा? हवालदिल शेतकऱ्यांचा प्रश्न - Watch Video
हिंगोली जिल्हा काल दुपारी कोरोनामुक्त असल्याचं जाहीर करण्यात आले होते मात्र रात्री काही लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर हिंगोलीत पुन्हा कोरोनाची दहशत वाढली आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा मात्र कोरोनामुक्त झाला आहे.