Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस संकटाच्या बाबतीत विचार करायचे देशातील इतर सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हॉटस्पॉट ठरला आहे. महाराष्ट्रातील कोविड 19 बाधित रुग्णांचा आकडा देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी तुम्हाला माहिती आहे काय? आम्ही ती इथे देत आहोत. ही आकडेवारी अधिकृत असून राज्य सरकारने दिलेली आहे. यात राज्यातील कोरोना रुग्ण आणि कोरोनाबाधित मृतांचा समावेश आहे. पाहा तुमच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस स्थिती काय आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या विचारात घेताना त्याला दुसरीही एक बाजू आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात कोरोना व्हायरसबाबत केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाणही अधिक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना व्हायरसबाबत अधिकाधिक चाचण्या होत आहेत. तसेच, महाराष्ट्र हे भारतातील एक सर्वात विकसित आणि अग्रेसर राज्या आहे. तसेच राज्याती आर्थिक राजधानी मुंबई हीसुद्धा महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे या राज्याचा आंतरराष्ट्रीय संपर्कही मोठ्या प्रमाणावर आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची इथे दिलेली आकडेवारी ही 21एप्रिल 2020 या दिवशी सायंकाळी 6 वाजता अद्ययावत करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्रालय प्रत्येक दिवसाची कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आणि तपशील हा त्या त्या दिवशी सायंकाळी 6 किंवा त्याच दिवशी रात्री उशीरा अद्यावत करत असते. त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृत आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus In India: भारतामध्ये 19,984 जण कोरोनाग्रस्त; 24 तासामध्ये वाढले 1383 रूग्ण)

                   कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*आकडेवारी दि. 21 एप्रिल 2020, सायं 6.00)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 3451 151
2 ठाणे 22 2
3 ठाणे मनपा 150 4
4 नवी मुंबई मनपा 94 3
5 कल्याण डोंबिवली मनपा 93 2
6 उल्हासनगर मनपा 1 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 6 0
8 मीरा भाईंदर 81 2
9 पालघर 18 1
10 वसई विरार मनपा 111 3
11 रायगड 16 0
12 पनवेल मनपा 34 1
  ठाणे मंडळ एकूण 4077 169
1 नाशिक 4 0
2 नाशिक मनपा 6 0
3 मालेगाव मनपा 85 8
4 अहमदनगर 21 2
5 अहमदनगर मनपा 8 0
6 धुळे 2 1
7 धुळे मनपा 2 0
8 जळगाव 1 0
9 जळगाव मनपा 2 1
10 नंदुरबार 4 0
  नाशिक मंडळ एकूण 135 12
1 पुणे 19 1
2 पुणे मनपा 646 52
3 पिंप्री-चिंचवड मनपा 51 2
4 सोलापूर 0 0
5 सोलापूर मनपा 25 2
6 सातारा 13 2
  पुणे मंडळ एकुण 754 59
1 कोल्हापूर 6 0
2 कोल्हापूर मनपा 3 0
3 सांगली 26 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 1 1
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 8 1
  कोल्हापूर मंडळ एकुण 45 2
1 औरंगाबाद 1 0
2 औरंगाबाद मनपा 34 3
3 जालना 1 0
4 हिंगोली 1 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 1 0
  औरंगाबाद मंडळ एकूण 38 3
1 लातूर 8 0
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 0 0
  लातूर मंडळ एकूण 12 0
1 अकोला 7 1
2 अकोला मनपा 9 0
3 अमरावती 0 0
4 अमवरावती मनपा 6 1
5 यवतमाळ 16 0
6 बुलढाणा 21 1
7 वाशीम 1 0
  अकोला मंडळ एकूण 60 3
1 नागपूर 3 0
2 नागपूर मनपा 76 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 0 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 2 0
8 गडचिरोली 0 0
  नागपूर मंडळ एकूण 82 1
1 इतर राज्य 15 2
  एकूण 5218 251

महाराष्ट्रासोबत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते आहे. गेल्या 24 तासात देशात 1383 नवे रुग्ण आढळले. तर, कोरोना बाधित 50 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 19,984 इतकी झाली आहे. त्यातील 3870 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण 640 जणांचा मृत्यू झाला आहे. केद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.