Coronavirus in India (Photo Credits: Getty Images)

जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता भारतामध्येही आपले हातपाय पसरायला लागला आहे. देशामध्ये मागील 24 तासामध्ये सुमारे 1383 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने आता एकूण आकडा 19,984 वर पोहचला आहे. यामध्ये काल दिवसभरामध्ये 50 जणांनी आपला प्राणही गमावला आहे. देशाच्या विविध भागामध्ये सध्या 15,474 रूग्णांवर उपचार सुरू असून भारतातील एकूण बळींचा आकडा 640 पर्यंत पोहचला आहे. भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याने आता महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडूनही विशेष पथक दाखल झाले आहे. या पथकाकडून सध्या मुंबईच्या विविध भागांचा आढावा घेऊन माहिती घेतली जात आहे.

दरम्यान भारतामध्ये गोवा हे राज्य कोरोनामुक्त झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मात्र देशाच्या इतर महत्त्वाच्या मेट्रो सिटीमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने भारतीयांमध्ये चिंतेंचं वातावरण आहे.केरळमध्ये रूग्ण कोरोनावर मात करण्याचा दर सर्वाधिक 71 % आहे.   COVID-19 Antibody Test:कोव्हिड 19 ला रोखण्यासाठी रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कशी मदत करणार?

 

ANI Tweet

भारतात कोरोनाला रोखण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार सुरूवातीला तो पहिल्या टप्य्यांत 14 एप्रिल पर्यंत म्हणजे 21 दिवसांचा होता. मात्र आता त्यामध्ये 19 दिवसांची वाढ करून तो 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.