महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) जाळे पसरत चालले असून मृतांच्या संख्येत देखील वाढ होत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 5281 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 251 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर मुंबईत 3451 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता राज्यातील स्थिती खूपच चिंताजनक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यात काल रात्री पुण्यात कोरोना बाधित 53 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची एकूण संख्या 55 झाली आहे.
महाराष्ट्रासोबत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते आहे. गेल्या 24 तासात देशात 1383 नवे रुग्ण आढळले. तर, कोरोना बाधित 50 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 19,984 इतकी झाली आहे. त्यातील 3870 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण 640 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; ताजे अपडेट एका क्लिकवर
कोरोना व्हायारसचं संकट हे केवळ आता जागतिक आरोग्य संकट राहिलेले नसून त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेलाही बसत आहे. सोबतच लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्यांसाठी अनेक गोर गरिबांना मदतीचा हात पुढे यायला सुरूवात झाली आहे. मात्र कोरोनाचा वाढता विळखा पाहता आता उद्योजक, व्यावसायिकांनी पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान CSR वरून राज्य आणि केंद्र सरकारच्या फंडातील मदतीबाबत मतभेद होते. मात्र आता महाराष्ट्र राज्यामध्येही "महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण " या नावाने स्वतंत्र बॅंक खातं उघडून उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) उदारपणे योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.