देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नागपूर (Nagpur) आणि गोंदिया (Gondia) येथे कोरोनाचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 4 रुग्ण नागपूर तर 1 गोंदिया येथील असल्याची माहिती नागपूरचे विभागीय आयुक्त (Divisional Commissioner Nagpur) यांनी दिली आहे. त्यामुळे 130 वर असलेला कोरोना बाधितांचा आकडा आता 135 झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिक चिंतेत आहेत. दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग (Social Distancing) पाळणं महत्त्वाचं आहे. तसंच लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या महाभयंकर संकटावर मात करणे काहीसे सोपे होईल.
भारतात कोरोना व्हायरस ग्रस्तांचा आकडा 724 झाला आहे. तसंच त्यात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास आळा बसेल आणि अधिकाधिक नागरिक सुरक्षित राहतील. (Coronavirus In India: भारतामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 724, महाराष्ट्रातील विदर्भात 5 नवे रूग्ण)
ANI Tweet:
5 more people have tested positive for #coronavirus - 4 from Nagpur & 1 from Gondia: Divisional Commissioner Nagpur (Maharashtra)
— ANI (@ANI) March 27, 2020
कोरोना व्हायरसच्या संकटांचा फटका सर्वच स्तरातील व्यक्तींना बसला आहे. तसंच याचा परिणाम अनेक उद्योगधंदे, व्यवसायांवर झाला आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांकडून गोरगरीब, नोकरदार वर्ग यांसाठी विशेष पॅकेजची सोय करण्यात आली आहे. तसंच शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांनी आपला एक महिन्याचा पगार प्रधानमंत्री साहाय्यता निधीत देण्याचे जाहीर केले आहे. तसंच सेलिब्रेटींसह विविध स्तरातून मदत करण्यासाठी लोक पुढाकार घेत आहेत.