भारतामध्ये दिवसागणिक कोरोना व्हायरसबाधितांचा आकडा वाढत आहे. आज (27 मार्च) ला सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, COVID-19 च्या बाधितांचा आकडा 724पर्यंत पोहचला आहे तर या आजारामुळे मृत पावलेल्यांचा आकडा आता 17 वर आला आहे. देशामध्ये कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र आणि केरळ राज्य अग्रस्थानी आहेत. दरम्यान आज महाराष्ट्रात नागपूरमध्ये 4 आणि गोंदिया मध्ये 1 नवा रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. शहरांप्रमाणेच भारताच्या ग्रामीण भागातही आता झपाट्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. सध्या या जीवघेण्या आजारापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एक खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे. सध्या 25 मार्च पासून 21 दिवस म्हणजे 14 एप्रिलपर्यंत भारत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सध्या भारतामध्ये देशांर्तगत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रवाससेवा ठप्प करण्यात आल्या आहेत. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक ही प्रवाशांसाठी पूर्णपणे ठप्प झाली असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस घरामध्ये बसूनच कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी मदत करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. Coronavirus: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले कोरोना व्हायरस विरोधात केंद्र सरकारचे विशेष पॅकेज; कर्मचारी, महिला, शेतकरी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार मदत.
भारतामध्ये काल एका दिवसामध्ये 88 नव्या रूग्णांची भर पडली. ही एका दिवसात मोठी वाढ होती. त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा धोका गंभीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे. जगभरात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 5 लाखाच्या पार गेला आहे. सध्या युरोप, अमेरिका मध्ये कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. चीनमधून सुरू झालेलं कोरोना व्हायरसचं संकट आता जगभरात थैमान घालत आहे. सध्या अमेरिका हे कोरोना व्हायरसचं केंद्र बनत आहे.
PTI Tweet
Death toll due to COVID-19 rises to 17 in India; cases soar to 724: Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) March 27, 2020
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारत सरकारकडून गरीबांसाठी, नोकरदारांसाठी काल खास आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आज आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी काही खास आर्थिक व्यवहारांशी निगडित मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र भविष्यात महागाई वाढू शकते असे सांगण्यात आले आहे.