Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

देशभरासह राज्यात कोरोनावरील लसीचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरणाच्या वेळी प्रथम आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंट लाइन वर्क यांना ती दिली जाणार आहे. यातच आता सर्वसामान्यांना कोरोनाची लस ही केंद्र सरकारने मोफत द्यावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तर उस्मानाबाद मधील एका रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी राजेश टोपे यांनी लसीकरणासंदर्भात अधिक माहिती दिली.(Covid-19 Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात कोविड-19 लसीकरण स्थगितीवर आरोग्य विभागाने दिले 'हे' स्पष्टीकरण)

केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सुचनांनुसार लसीकरणाची मोहिम राज्यातील विविध ठिकाणी पार पाडली जात आहे. तर राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेला केंद्राकडून उत्तम सहकार्य ही मिळत असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तसेच लसीच्या संपूर्ण खर्चाचा भार सुद्धा केंद्राने उचलावा असे ही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लसीकरणाची मोहिम राज्यात रद्द झाल्याचे बोलले जात होते. यावर आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण दिले गेले. त्यांनी असे म्हटले की, 17 आणि 18 जानेवारीला लसीकरण पार पडणार नाही. परंतु केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढील आठवड्यापासून लसीकरण पार पाडले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Coronavirus Vaccination: CoWIN App वर आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे महाराष्ट्रात कोरोना विषाणू लसीकरण 18 जानेवारीपर्यंत तात्पुरते स्थगित)

दरम्यान, लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या टप्प्यात आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.