देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुद्धा केली जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 320 वर जाऊन पोहचला तरीही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स किंवा अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बेजबाबदार पणे वागणाऱ्यांच्या आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही अशा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याच पार्श्वभुमीवर सोशल मीडियात व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेले टिकटॉक याच्या माध्यमातून लॉकडाउनच्या विरोधात खिल्ली उडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित टिकटॉकस्टारसह अन्य काही जणांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
टिकटॉक स्टार फैजल शेख याचे लाखोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. फैजल याने एक नवा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात बॉलिवूडमधील चित्रपट किक यामधील नवाजदुद्दीनचा डायलॉग सादर केला. त्यानुसार डायलॉगमध्ये 'मौत को छुकर वापस आ सकता हू' असे म्हटले असून त्याचा व्हिडिओ बनवला आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांना घरातच थांबवण्याची सुचना दिली जात आहे. पण फैजल याचा टिकटॉकटा हा व्हिडिओ पाहून नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहे. त्यामुळे मुंबईतील वकिल अली खान देशमुख यांनी याच्या विरोधात आंबोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच फैजलसोबत टिकटिकॉच्या व्हिडिओतील अन्य जणांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.(Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व सीमा 14 चेकनाक्याच्या माध्यामातून बंद केल्या; पहा फोटो)
यापूर्वी सुद्धा फैजल याचे टिकटॉकचे अकाउंट पोलिसांकडून ब्लॉक करण्यात आले होते. त्यावेळी त्याने आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केले होते. तर गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच फैजलचे अकाउंट सुरु करण्यात आले असून त्याने पुन्हा असे संतापजनक चाळे केल्याने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.