Coronavirus: कल्याण-डोंबिवली महापौर विनिता राणे पुन्हा एकदा परिचारिका रुपात; कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटल मध्ये दाखल
KDMC Mayor Vinita Rane (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या उपचारासाठी कल्याण डोंबिवलीच्या (Kalyan-Dombivli) महापौर विनिता राणे (Vinita Rane) या पुन्हा एकदा आपला परिचारिकेचा युनिफॉर्म परिधान करून सज्ज झाल्या आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याच्या आधी त्यांनी मुंबईच्या नायर रुग्णालयात परिचारिका म्ह्णून अनेक वर्ष काम केले होते त्याच अनुभवातून त्या आता पुन्हा एकदा रुग्णसेवा करणार आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांनी एक फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील निवृत्त तसेच वैद्यकीय शिक्षण व कामाचा अनुभव असणाऱ्यांना कोरोनाच्या संकटकाळात पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते त्यानुसार विनिता राणे यांनी पुन्हा परिचारिका म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले होते. COVID19: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा हटके उपक्रम; परिचारिकाच्या वेशात केली नायर रुग्णालयात एंट्री (Watch Video)

प्राप्त माहितीनुसार, आता आपल्या या निर्णयानुसार विनिता राणे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्रीनगर कोविड-19 रुग्णालयात आपला पूर्वीचा परिचारिकेचा पेहराव अंगावर चढवून दाखल झाल्या आहेत.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पी.पी.इ किट परिधान करून त्यांनी रुग्णांची पाहणी केली तसेच यावेळी कोरोना व्हॉरियर्स डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन दिले. या पार्श्वभूमीवर विनिता राणे यांच्या कामाचे सोशल मीडिया वरून कौतुक होत आहे.

पहा व्हिडिओ

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात परिचारिकेच्या गणवेशात प्रवेश घेतला होता. कोरोनाचे संकट हे भीषण आहे अशावेळी पदाची खुर्ची सांभाळत बसण्यापेक्षा काम करणे महत्वाचे आहे असे म्हणत पेडणेकर यांनी सुद्धा पुन्हा एकदा परिचारिकेचे काम करण्याची तयारी दर्शवली होती.