Kishori Pednekar (Photo Credits: Twitter)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) या आज 27 एप्रिल रोजी एका अनोख्या अंदाजात नायर रुग्णालयात (Nair Hospital) पाहायला मिळाल्या, मागील काही महिन्यांपासून कोरोना नामक संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, परिचारीका, वार्ड बॉय, हॉस्पिटल मधील सफाई कर्मचारी अशी सर्व मंडळी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याच कर्मचाऱ्यांना उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी आज किशोरी पेडणेकर या चक्क परिचारिकाच्या वेशात नायर रुग्णालयात गेल्या होत्या. या रुगणालयात जाऊन त्यांनी रुग्णांची विचारपूस केली. आणि परिचारिकांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी या संकटात खबरदारीने वागावे त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काम करण्याची जबाबदारी आम्हाला सांभाळू द्यावी असे भावनिक आवाहन सुद्धा पेडणेकर यांनी केले आहे. महाराष्ट्रातील Coronavirus संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर

नवरदेव बाईकवरुन नवरीकडे गेला आणि लग्न करुन नवरीला घेऊन आला; उत्तर प्रदेशातील अनोखा विवाह : Watch Video 

प्राप्त माहितीनुसार, नगरसेविका होण्यापूर्वी किशोरी पेडणेकर या स्वतः परिचारिका होत्या. आता कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींना सुद्धा उपचार कार्यात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांनी आज हा वेष करून रुग्णलयात प्रवेश घेतला होता. या संकटाच्या काळात केवळ पदाची जबाबदारी मिरवत बसण्याऐवजी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या कामात हातभार लावणे आपले उद्दिष्ट आहे असे पेडणेकर यांनी म्हंटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या या उपक्रमाची माहिती दिली.

किशोरी पेडणेकर ट्विट

दरम्यान, मुंबई मध्ये सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट आहे यापुढे कोणतेही संकट आल्यास त्याचा लढा देण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, असेही पेडणेकर यांनी म्हंटले आहे.