NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करताना घेण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) निर्णयामुळ इतर राज्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार(NCP MLA Rohit Pawar) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ही भूमिका मांडताना केंद्र सरकारबद्दल नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी महाराष्ट्र सरकारलाही सल्ला दिला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडलेली ही भूमिका प्रथमदर्शनी तरी फक्त विद्यार्थ्यांशी संबंधित असल्याचे दिसते. विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात केंद्र सरकार (Central Government) सहकार्य करत नसेल तर महाराष्ट्राने मागे राहू नये. आपला निर्णय घ्यावा, असा रोहित पवार यांचा सूर आहे.

रोहित पवार यांनी नेमके काय म्हटले आहे?

''अन्य राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यास केंद्र सरकार सहकार्य करत नसेल व इतर राज्ये आपापल्या लोकांना बस पाठवून आणत असतील तर आपणही आपल्या लोकांसाठी मागे राहू नये, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आरोग्यविषयक नियम पाळून राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना आणावंच, अशी माझी विनंती आहे''. इतर राज्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गोची झाली आहे. कारण, लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही. इतर राज्यांमध्ये असल्याने त्यांना तिथली भाषा, व्यवस्था ही फारशी अवगत नाही. त्यामुळे त्यांचे भोजन, आरोग्य आणि आर्थिक समस्या असा सामना या विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

दरम्यान, केद्र सरकार कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या लढाईत राज्याला आवश्यक त्या पद्धतीने सहकार्य करत नाही, आसा अनेकांचा आरोप आहे. यात पत्रकार, विचारवंत आणि अनेक अभ्यासकांचा समावेश आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अथवा महाविकासआघाडी सरकारमधील कोणा मंत्र्यांनी आतापर्यंत केंद्र सरकारबाबत एकही विरोधी प्रतिक्रिया दिली नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार महाराष्ट्राशी आवश्यक तो सवाद साधत आहे. मदत करत आहे, अशीच भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Coronavirus Lockdown नंतर स्थलांतरित मजुरांच्या सोयीसाठी रेल्वेने मुंबई, पुणे मधुन विशेष ट्रेन चालवाव्यात : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी)

रोहित पवार ट्विट

दरम्यान, केवळ विद्यार्थिच नव्हे तर महाराष्ट्रात असलेल्या इतर राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी केंद्र सरकारने काही विशेष रेल्वे गाड्यांची सोय करावी, असी मागणी राज्य सरकारने केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतचे एक पत्र केंद्र सरकारला पाठवले असल्याचे समजते. दरम्यान, केंद्र सरकारने अद्याप तरी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या नागरिकांना इथेच थांबावे लागणार की, त्यांच्या मूळ गावी जाता येणार याबबत उत्सुकता आहे.