Medical Workers (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) ओसरलेला जोर आता महाराष्ट्रात पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा तीनही मोठ्या शहरांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यांनतर आता सलग तिसऱ्या दिवशी कोरोना संसर्गाच्या रुग्णांनी 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज महाराष्ट्रामध्ये 11,141 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 6,013  रुग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात 38 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे एकूण प्रकरणांची संख्या 22,19,727 झाली आहे.

यापैकी आतापर्यंत 20,68,044 रुग्ण बरे झाले आहेत, मृत्यूची संख्या 52,478 इतकी आहे व सध्या 97,983 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आज 1360 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 1020 रुग्ण बरे झाले असून, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईमध्ये 10,731 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईमधील एकूण रुग्णसंख्या 333564 इतकी झाली आहे. यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे मुंबई जिह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्के आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 231 दिवस आहे.

पुणे शहरात आज नव्याने 984 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 2, 08, 330 इतकी झाली आहे. शहरातील 750 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून, पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 1, 96, 751 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 6,689 ग्णांपैकी 341 रुग्ण गंभीर तर 682 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

(हेही वाचा: औरंगाबाद मध्ये 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन, दर शनिवार-रविवार कडकडीत बंद)

दरम्यान, सध्या देशभरात कोरोना विषाणू लसीकरण मोहीम जोरदार सुरु आहे. 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या या महिमेचा सध्या दुसरा टप्पा चालू आहे. बीएमसीदेखील (BMC) व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवत आहे.