कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतात दाखल झाल्यापासून नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासात 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. केवळ महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाबाधीत लोकांच्या यादीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे केंद्र आणि राज्यसरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत नसल्याचे समोर येत आहेत. दरम्यान, अशा नागिरकांनावर कारवाई केली जात आहे. यातच हातावर होम क्वारंटाइनचा (Home Quarantine) शिक्का असतानाही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर रायगड पोलिसांनी (Raigad Police) गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनाही श्रीवर्धन तालुक्याती खारशेत भावे येथे ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतत नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, क्वारंटाइन असतानाही बाहेर फिरत असणाऱ्या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव असलेल्या देशांतून परतणाऱ्या नागरिकांना निगराणी कक्षात आणि होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येत असून त्यांना घरातून बाहेर फिरण्यास बंदी केलेली आहे. मात्र, घरात राहण्याचा आदेश असूनही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर रायगड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तिघेही नुकतेच परदेशातून परतले होते. श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथे होम क्वारंटाइनचे शिक्के असणाऱ्या तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. हे देखील वाचा- मुंबई: Coronavirus च्या पार्श्वभूमीवर उपहारगृहे सुरु ठेवणा-यांना करावे लागणार 'या' अटींचे पालन नाहीतर होईल कायदेशीर कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारची कोरोना व्हायरसची लक्षणे दिसली नाहीत. मात्र, ते नुकतेच परदेशातून परतले होते. तसेच त्यांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्काही मारण्यात आला असून ते बाहेर फिरत होते. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कलम 188 व 269 नुसार गुन्हा दाखल केला आहे.