Coronavirus: कोरोनामुळे औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहातील कैद्यांच्या आहारात बदल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यातच कारागृह प्रशासनाने कैद्यांच्याबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. आता औरंगाबाद (Aurangabad) येथील हर्सूल कारागृहातील (Harsul Jail) कैद्यांच्या जेवणाच्या पदार्थामध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे या कैद्यांच्या आहारात आठवड्यातून 2 वेळा पालेभाज्या, गाजर, बीट यांचा समावेश करण्यात आला आहे. कैद्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढायली हवी म्हणून या उपाययोजना करण्यात आली आहे. तसेच नव्या कैद्याला हात साबणाने व सॅनिटायझरने धुतल्याशिवाय कारागृहात प्रवेश दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

कोरोनाने आता महाराष्ट्रातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सध्या संपूर्ण भारतात 147 लोकांना कोरोना ला43गण झाली असून केवळ महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर पोहचली आहे. तर, मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेणाऱ्या एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहातील कैद्यांच्या आहारात बदल केला आहे. या कारागृहाची क्षमता 1 हजार कैदी ठेवण्यापर्यंतची आहे. मात्र, आता याच कारागृहात एकूण 1 हजार 850 कैदी आहेत. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एकाला लागण झाली तर ती अनेकांना होऊ शकते म्हणून योग्य ती काळजी घेण्यासाठी अलीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक कारागृहात आले होते. सध्या कैद्यांना दररोज सकाळी उठल्यानंतर लिंबूपाणी दिले आहे. मात्र, यापुढे कैद्यांना आठवड्यातून 2 वेळा पालेभाज्या आणि गाजर, बीट यांचाही समावेश करण्यात आला आहे. रविवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हेतर कारागृहात साबण आणि पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे. हे देखील वाचा- मुंबई व पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग; राज्यातील Corona Virus बाधित रुग्णांची संख्या 41

कोराना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातला असून कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत 7 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झालेली आहे. एकट्या चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण होऊन 3 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर इटलीमध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे आकडेवारी समोर आली आहे. भारतातही कोरोनाची लागण होऊन 2 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.