महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असून राज्यात कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण संख्या 4,666 वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या मुंबईत (Mumbai) 155 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून येथील रुग्णांची संख्या 3090 जाऊन पोहोचली आहे. ही आकडेवारी मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, काल 7 नव्या रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत मृतांची एकूण संख्या 138 जाऊन पोहोचली आहे.
त्याशिवाय महाराष्ट्रात सोमवारी 466 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. ज्यामुळे राज्यातील ही संख्या 4,666 वर जाऊन पोहोचली आहे. ही आकडेवारी खूपच चिंताजनक असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. Coronavirus Outbreak: कोरोना रुग्णांची संख्या 18,601 वर; आतापर्यंत 590 जणांचा मृत्यू, पहा आजची आकडेवारी
Coronavirus case tally crosses 3,000-mark in Mumbai as 155 more test positive; death toll reaches 138 after addition of 7 fatalities: BMC
— Press Trust of India (@PTI_News) April 20, 2020
कोविड-19 काल दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात मृतांची एकूण संख्या ही 232 वर जाऊन पोहोचली आहे. केवळ 4 दिवसांत राज्यात 1000 नवे रुग्ण आढळल्याने स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे सांगण्यात येत आहे.
तर पुण्यात कोविड-19 चे 65 नवे रुग्ण समोर आले असून या जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 734 झाली आहे.
दरम्यान मागील 24 तासात भारतात कोरोनाच्या 1336 नवीन रुग्ण आणि 47 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 18,601 वर पोहचला आहे. यामध्ये 14759 सक्रिय रुग्ण 3252 बरे झालेले रुग्ण आणि 590 मृतांचा समावेश आहे.