 
                                                                 महाराष्ट्र पोलीस ( Maharashtra Police) दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील दत्तात्रय करगुटकर (ASI Sunil Dattatray Kalgutkar) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन (Vinoba Bhave Nagar Police Station) येथे ते कर्तव्य बजावत होते. मुंबई पोलीसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील दत्तात्रय करगुटकर यांच्याबाबत ट्विटरवरुन माहिती देताना महाराष्ट्र पोलिसांनी म्हटले आहे की, ''कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की कोरोनाव्हायरसशी झुंज देत असलेले, विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील दत्तात्रय करगुटकर यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम असतील.'' (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्रात आतापर्यंत 714 पोलिसांना कोरोनाची लागण- Maharashtra Police)
मुंबई पोलीस ट्विट
कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की कोरोनाव्हायरसशी झुंज देत असलेले, विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील दत्तात्रय करगुटकर यांचा मृत्यू झाला आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम असतील.
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 9, 2020
दरम्यान, आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांसहीत 714 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यापैकी 648 जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. 61 कर्मचारी उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवीर 9 मे पर्यंतची आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
