COVID-19 Pandemic: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट नियंत्रणासाठी आणि लॉकडाऊन (Lockdown) काळात उपाययोजनांसाठी मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 11 सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या समितीत प्रामुख्याने आयएएस दर्जाच्या माजी सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती अभ्यास करुन कोरोना व्हायरस संकट निवारण करण्यासाठी राज्य सरकारला उपाययोजना सूचवणार आहे. वित्त विभागाने या संदर्भातील निर्णय कालच (सोमवार, 14 एप्रिल) जारी केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ही समिती येत्या 30 एप्रिलपर्यंत राज्य सरकारला एक अहवालही सादर करणार आहे.
समितीमध्ये समावेश असलेल्या सदस्यांची नावे
- जे. एस. सहानी (सेवानिवृत्त आयएएस)
- सुबोधकुमार (सेवानिवृत्त आयएएस)
- रमानाथ झा (सेवानिवृत्त आयएएस)
- उमेशचंद्र सरंगी (सेवानिवृत्त आयएएस),
- जयंत कावळे (सेवानिवृत्त आयएएस)
- सुधीर श्रीवास्तव (सेवानिवृत्त आयएएस)
- नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव
- उद्योग विभागाचे प्रधान सचिव
- वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव
- कृषी विभागाचे सचिव
- वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक असतील
ट्विट
.... तसेच नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाच्या सचिवांचा समावेश. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 14, 2020
ट्विट
तज्ज्ञ सदस्यांच्या समितीत जे.एस. सहानी, सुबोधकुमार, रमानाथ झा, उमेशचंद्र सरंगी, जयंत कावळे, सुधीर श्रीवास्तव या सहा सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा समावेश.....
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 14, 2020
राज्यात कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च या दिवसापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचा राज्यातील उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र यांवर परिणाम झाला आहे. बहुतांश क्षत्रं ठप्प झाली आहेत. त्यामुळे राज्याचे उत्पन्न आणि विकासकामांवर मोठा परिणाम होत आहे. या संदर्भात उपाययोजना सूचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्या निर्णयानुसारच ही समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.