Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची (Corona Positive Patients) संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज 217 नव्या कोरोना रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6730 इतकी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 133 जणांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 3374 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 77 तर ग्रामीण भागातील 56 जणांचा समावेश आहे. कारोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. कोरोना मुक्तीसाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, महत्त्वाचे म्हणजे गर्दी टाळणे या नियमांचे पालन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले आहे. (हेही वाचा - राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचं लोकापर्ण)

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज औरंगाबादचे जिल्ह्याधिकारी उदय चौधरी यांनी कोविड केअर सेंटरचा आढावा घेतला. चौधरी यांनी आज शहरातील 3 सेंटर्सला दिली भेट दिली आणि कोविड योध्यांचे मनोधैर्य वाढविले. तसेच कोरोना रुग्णांशी संवाद साधला.