मुंबई मधून गोवा (Mumbai-Goa) कडे जाणार्या Cordelia Cruise Ship वर एका कर्मचार्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या क्रुझ वर 2 हजारापेक्षा अधिक प्रवासी आहेत. आता त्या सार्यांची कोविड 19 चाचणी (COVID 19 Test) केली जाणार आहे. नंतरच क्रुझला हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सध्या कोविडची लागण झालेल्या क्रु मेंबरला आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.
सध्या क्रु मेंबर्स आणि 2016 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट (RT PCR Test) करण्यासाठी पीपीई कीट मध्ये मेडिकल टीम दाखल करण्यात आली आहे. सध्य त्यांचा टेस्ट रिपोर्ट प्रतिक्षेमध्ये आहे.
आता क्रुझ Mormugao Port cruise terminal मध्ये आहे. क्रुझ वर एका व्यक्तीचा अॅन्टिजेन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता सार्यांचाच क्रुझवर खोळंबा झाला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने क्रुझला गोव्यामध्ये उभं राहण्यास मनाई करण्यात आली आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या गोव्यात लॅन्ड होणार्या प्रत्येक इंटरनॅशनल फ्लाईट मध्ये कोविड पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. आता आपण कोविड 19 प्रोटोकॉल बाबत सजग राहणं गरजेचे बनलेले आहे.
Cordelia Cruise ship मागील काही महिन्यांपासून चर्चेमध्ये आहे. याच क्रुझ्वर शाहरूखचा मुलगा आर्यनला ड्रग्स पार्टी दरम्यान ताब्यात घेण्यात आलं होतं. ही कारवाई एनसीबी कडून करण्यात आली आहे. भारतातील पहिली Indigenous Luxury Cruise Liner आयआरसीटीसी कडून लॉन्च;पहा त्याची खास वैशिष्ट्यं
या क्रुझला मुंबई वरून गोवा, लक्षद्वीप आणि कोच्चि साठी बुक केले जाऊ शकतं. कोरोना परिस्थिती लक्षात घेता आता या क्रुझची फॉरेन ट्रिप 2022 मध्ये सुरू करण्याचा प्लॅन होता. या क्रुझवर रेस्टॉरंट, बार, ओपन सिनेमा, मुलांना खेळण्यासाठी जागा आणि जीम अशा विविध सेवा उपलब्ध आहेत.