Mumbai Police News: काँग्रेस आमदार आणि राज्याचे माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh Death Threats) यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोनद्वारे धमकी देताना या व्यक्तीने आपली ओळख गोल्डी ब्रार (Gangster Goldy Brar) असल्याचे सांगितले आहे. आमदार शेख यांचे स्वीय सहायक आणि वकील विक्रम कपूर यांनी या संदर्भात मुंबईतील मालाड परिसरातील बांगूर नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. सदर घटना 5 ऑक्टोबर रोजी घडली असून त्याबाबत रविवारी (8 ऑक्टोबर 2023) तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्याच्या आधारे मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. असल्याचे सांगितल्याचे म्हटले. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून फोन कोठून आला याचा तपास सुरु केला आहे.
गोल्डी ब्रार हा सतींदरजीत सिंह नावाने ओळखला जातो. जो सध्या फरार असून कॅनेडीयन गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गँगशी संबंधीत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खान याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीत गोल्डी ब्रारचे नाव चर्चेत आले होते. आमदार शेख यांचे स्वीय सहायक विक्रम कपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडील प्राप्त तक्रारीनुसार विक्रम कपूर हे आमदारांना आलेले सर्व फोन आगोदर स्वीकारतात आणि पडताळणी करुन मगच आमदार अस्लम शेख यांच्याकडे हस्तांतरीत करतात. विक्रम कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी आमदारांच्या मोबाईलवर आलेल्या अज्ञाताच्या फोनवरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली.
अधिक माहिती अशी की, धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख गोल्डी ब्रार अशी करुन दिली. तो म्हणाला की, 'मी गोल्डी ब्रार बोलतो आहे. मी अस्लम शेख याला गोळ्या घालून दोन दिवसात संपवणार आहे. हे अस्लम शेख यांना सांगा.' कपूर यांनी पोलिसांना कॉलची तत्काळ तक्रार केली आणि त्यांना कॉलरशी संबंधित दोन फोन नंबर दिले. बांगूरनगर पोलिसांनी अस्लम शेख यांचे स्वीय सहाय्यक कपूर यांचा जबाब लिहून घेतला आहे. प्राप्त तक्रारीवरुन आरोपीविरोधात भादंसं कलम 502 (2) आणि 507 अन्वये गुन्हाही दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.
ट्विट
Congress MLA and former Maharashtra minister Aslam Shaikh received death threats. The caller identified himself as gangster Goldie Brar. The caller said, 'I am Goldie Brar, I am going to shoot Aslam Sheikh in two days'. Mumbai's Bangur Nagar police station registered a case…
— ANI (@ANI) October 8, 2023
अलिकडील काळात राजकीय नेते आणि सेलिब्रेटी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचे तसेच सार्वजणिक ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, संदेश देण्याचे प्रमाण वाढले आहे. मधल्या काळात अभिनेता सलमान खाल याला जीवे मारण्याची धमकी आली होती. तर अनेकदा मुंबई महापालिकेत बॉम्ब ठेवल्याचीही धमकी आली होती.