बिग बॉस ओटीटीचा (Bigg Boss OTT) हा सिझन सध्या एल्विश यादव (Elvish Yadav) या युट्यूबरमुळे (Youtuber) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिझनमध्ये एल्विश यादवला फाटकारल्यामुळे शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) फॅन्सच्या टार्गेटवर आला आहे. एल्विश यादवने बेबिका धुर्वेबद्दल अपमानजनक कमेंट केली होती. यानंतर सलमान खानने त्याला खडसावले आणि समजावले देखील होते. त्यानंतर सलमानविरोधात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर सलमान खानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याचे लक्षात आले. तसेच गोल्डीबार याने देखील पुन्हा एकदा सलमान खानला धमकी दिली आहे.
पाहा पोस्ट -
इसे देखकर तो सलमान खान का भी systumm हिल गया होगा 💪🏻
UNBREAKABLE ELVISH YADAV 🚀#ElvishYadav𓃵 #ElvishArmy #GoldyBrar #ElvishIsTheBoss#BiggBosOTT2 pic.twitter.com/Boq8TPlepI
— satvik yadav (@satvik9794) July 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)