Balasaheb Thorat Injured: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) मॉर्निंग वॉक (Morning Walk) करताना पडले असून त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती देताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या एका खांद्याला जखम झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात येत आहे. त्यांचे फॅमिली डॉक्टर मुंबईत पुढील उपचार करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. दुसरीकडे आमदार वसतिगृहातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजीव धावड यांनी सांगितले की, सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान मॉर्निंग वॉक करताना थोरात पडल्याची माहिती आम्हाला मिळाली. थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाली असून त्यांच्या कपाळावरही किरकोळ जखमा होत्या. आम्ही त्यांना प्राथमिक उपचारानंतर मेयो रुग्णालयात हलवले.
प्राप्त माहितीनुसार, नागपुरातील सेमिनरी हिल्सवर मॉर्निंग वॉकसाठी गेले असता थोरात यांना दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले व प्राथमिक उपचार करण्यात आले. आपल्या प्रकृतीची माहिती ट्विटरवर देताना थोरात यांनी आपण पूर्णपणे निरोगी असल्याचे लिहिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “नागपूर येथील सेमिनरी हिल्स येथे मॉर्निंग वॉक करताना पडल्याने माझ्या खांद्याला दुखापत झाली. माझ्यावर नागपुरातच प्राथमिक उपचार करण्यात आले. आता मी निरोगी आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारांसाठी मी मुंबईत जात आहे." (हेही वाचा - Maharashtra Assembly Winter Session 2022: उद्धव ठाकरे, अजित पवार विधिमंडळात आक्रमक; सीमावाद, गायरान जमीन, एनआयटी घोटाळा प्रकरण चर्चेत)
आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 26, 2022
सध्या बाळासाहेब थोरात हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी इतर नेत्यांसह नागपुरात आहेत. महाराष्ट्रातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात हे सध्या महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.