Commonwealth Games 2022 (Photo Credit: Twitter/File photo)

बर्मिंघम (Birmingham) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत (Common Wealth Games 2022) सुरक्षेबाबत काही चूक झाल्याचे पुढे आले आहे. ही चूक सुधारण्यासाठी कुस्तीचे सामने (Wrestling Events) सुरु असलेले संपूर्ण मैदान खाली करण्यात आले आहे. मैदानावरील सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत. प्रेक्षकांना बाहेर काढण्यात येत आहे. सर्व तपासणी होऊन सुरक्षेतील चूक सुधारल्यावर पुन्हा मैदानात प्रवेश दिला जाईल असे सांगितले जात आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलींगच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

कुस्तीचे मैदान खाली करण्यात येत होते तेव्हा भारताचे खेळाडू मैदानात होते. याच मैदानावर भारताच्या बजरंग पूनिया आणि दीपक पूनिया यांनी जोरदार यश मिळवत क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. दरम्यान, पुढचे सामने काहीशा विलंबाने सुरु होणार आहेत. (हेही वाचा, CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, हॉकी सामन्यादरम्यान दोन खेळाडूंमध्ये हाणामारी (Watch Video))

ट्विट

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ट्विट केले आहे की, आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करतो आहोत. त्यासाठी सामने काही काळ स्थगित केले आहेत. सर्व सुरक्षा पडताळणी झाल्यावर सामने पुन्हा एकदा सुरु होतील. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कुस्तीचे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 5.15 वाजता पुन्हा सुरु होतील.