जिल्हा आणि सामान्य रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृहसह रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही आरामदायी भोजनकक्ष उभारले जाणार- आरोग्य विभाग
फोटो सौजन्य - गुगल

सामान्य नागरिक जिल्हा आणि सामान्य रुग्णालयात (District And General Hospital) मोठ्या संख्येने उपचार घेत असतात. पंरतु, सामान्य रुग्णालयात उपचार घेत असताना नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत. आरोग्य विभागाच्या रुग्णालयांतील स्वच्छतागृहे हा कायमच टीकेचा विषय बनला आहे. त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजनकक्ष आणि पिण्याचे स्वच्छ पाण्याची सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) सर्व जिल्हा आणि सामान्य रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृहे आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आरामदायी भोजनकक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Department) यांनी दिली आहे. तसेच यासाठी तब्बल 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात 23 जिल्हा रुग्णालये तर, 8 सामान्य रुग्णालये आहेत. तसेच 450 उपजिल्हा आणि ग्रमीण रुग्णालय आहेत. यात 30 ते 100 खाटा उपलब्ध आहेत. योशिवाय एकूण 1828 प्राथमिक आरोग्य केंद्र तर, 10 हजार 668 उपकेंद्र आहेत. महत्वाचे म्हणजे, यांपैकी बहुतेक रुग्णालय, उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. तर, काही रुग्णालयात जवळपास 50 टक्क्यांहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही.यामुळे नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत. एवढेच नव्हेतर, रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनकक्ष नसल्यामुळे ते सर्वजण रुग्णालयाच्या आवारात जेवायला बसल्याचे पाहायला मिळाले, याचीच गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे सामान्य नागरिकांना स्वच्छतागृहे आणि भोजनकक्षाची अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Coronarvirus: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 53 हजार 981 प्रवाशांची तपासणी; 2 संशयित रुग्ण आढळल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

दरम्यान, यासाठी एकूण 35 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात अत्याधुनिक तसेच जास्तीत जास्त लोकांचा सहज वावर होईल अशा प्रकारची स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांना एकाच ठिकाणी भोजन करण्यासाठी रुग्णालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत भोजनकक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे