CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

जेएनयूमध्ये झालेला हल्ला (Attack on students at JNU) हा 26/11 च्या हल्याप्रमाणेच. मतमतांतरे असू शकतात. सरकार कोणाचेही असले तरी, अशा प्रकारचे हल्ले कोणत्याही प्रकारे योग्य नाहीत. वसतीगृहामध्ये असलेले विद्यार्थीच जर सुरक्षीत नसतील तर हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही, अशी थेट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी व्यक्त केली आहे. बुरखाधारी लोकांनी जेएनयूमध्ये हल्ला केला. हे हल्लेखोर भ्याड होते. या बुरख्यामागे असलेले चेहरे जनतेसमोर येणे आवश्य आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  जेएनयूमध्ये हल्ले झाले. मात्र, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि युवकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आणि युवक, विद्यार्थ्यांना आश्वास्त केले. (हेही वाचा, मुंबई: उद्धव ठाकरे, अशोक गहलोत या दोन मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक; 'मातोश्री' येथे चर्चा)

एएनआय ट्विट

देशातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता समजून घेणे गरजेचे आहे. देशभरातील तरुणांचा उद्रेक समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर हल्ला करणारे हल्लेखोर देशासमोर यावेत, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.