महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (11 ऑक्टोबर) दिवशी पुन्हा राज्यातील जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आहे. सध्या मिशन बिगीन अंतर्गत राज्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आली आहे. पण त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. दरम्यान मेट्रो 3 आणि मेट्रो 6 साठी आता आरे ऐवजी आता कांजूर मध्ये कारशेड होणार आहे. ही मुंबईकरांसाठी मोठी बातमी दिली आहे. यावेळेस त्यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमांची दखल घेत आरोग्य कर्मचार्यांचे धन्यवाद मानले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या काही गोष्टींबाबत हलगर्जीपणा करण्याबाबतही बोट ठेवून खबरदारी घेण्याचं पुन्हा आवाहन केले आहे. Mumbai Metro Car Shed: मुंबई मेट्रो साठी Aarey Colony ऐवजी कांजूर मार्ग मध्ये नवं कारशेड.
उद्धव ठाकरे यांच्या लाईव्ह मधील महत्त्वाचे मुद्दे
- आरे जंगल बचावण्यासाठी आंदोलनातील आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.
- मुंबई शहरामध्ये आरे जंगल घोषित करण्यात आले आहे ते 800 एकर पर्यंत वाढवले.
- आरे ऐवजी कांजुर मध्ये मेट्रो कार शेड होणार
- कृषी कायद्यावर शेतकर्यांशी बोलणार, हिताचे नसल्यास कायदे स्वीकारणार नाहीत
- कोविड 19 ला घाबरू नका. लवकर निदान झाल्यास उपचार करून आजारावर मात करणं शक्य
- अतिवृष्टी झालेल्या भागात नुकसान भरपाई मिळणार
- मास्कचा वापर योग्य प्रकारे करा, हात वारंवार धुवा यामुळे संसर्ग टाळण्यासाठी मदत होणार आहे.
- राज्यांंतर्गत रेल्वे सेवा सुरू आहे पण लोकल सेवा साठी फेर्या वाढवल्या जातील त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलं आहे.
- जीम सुरू करण्याबाबत SOP वर काम सुरू आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/E8qhmRTulz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 11, 2020
महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 15,17,434 झाली असून काल पहिल्यांदाच नव्या रूग्णांच्या दुप्पटीने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या होती. काल 11,416 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 26 440 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 12,55,779 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,21,156 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.76% झाले आहे.