CM Eknath Shinde | Twitter/CMO

CM Eknath Shinde Cabinet Decision:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde)यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्री मंडाळाची कॅबिनेट (Cabinet) बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येकासाठी आरोग्य संदर्भात निर्णय घेतले. राज्यातील केशरी व अंत्योद्य शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित असलेली महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान आयुष्मान भारत योजनांचे  एकत्रीकरण करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे.

या दोन योजनेच्या एकत्रिकरणामुळे पुर्वी दीड लाखांचे आरोग्य कवच मिळयाचे आता पाच लाखांचे आरोग्य कवच प्रत्येकाला मिळणार आहे. मुख्यमंत्र्याच्या ह्या निर्णयामुळे सर्वांनाच आरोग्य विमाचा लाभ घेता येणार आहे. राज्यात उपचारांसाठी रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात येणार असल्याचे निर्णय घेतला आहे.

केंद्र आणि राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष पाच लाख रूपये आहे. आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष पाच लाख रूपये एवढे करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना  दोन्ही योजनांच्या एकत्रीकरणांमुळे १३६५ उपचारांचा  लाभ होणार आहे.