 
                                                                 Chhatrapati Sambhaji Nagar Video: छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयातील पेसेंटच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाले आहे. क्षुल्लक कारणांवरून दोन गटात मारामारी झाली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे चार जवान देखील होते. तरीही हे भांडण टोकाला गेले. या घटनेत गटातील सदस्यांनी रागाच्या भरात महिला डॉक्टरांवर हल्ला केला आहे. (हेही वाचा- पैशावरुन वाद, मजूराचे डोळे फोडले; पाचशे रुपयांसाठी गळा चिरून हत्या)
मिळालेल्या माहितीनुसार,या मारामारीच्या घटनेत एक पुरुष जखमी झाला तर महिला डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्यांच्या क्षुल्लक कारणांवरून वाद झाला होता त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून फ्री स्टाईल मारामारी सुरु होती. ही घटना संपुर्ण सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेत निष्पाप महिला डॉक्टरांना जब्बर मार लागला आहे. डॉक्टरांच्या डोक्यात रॉड लागल्याची माहिती मिळाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घुसून एका टोळक्याने निवासी डॉक्टरांना रॉडने मारहाण केल्याची घटना घडली. हि अतिशय गंभीर बाब आहे. रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स देखील सुरक्षित नसतील तर रुग्णसेवा सक्षम कशी राहिल? मूळात या राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नाही. त्यामुळे हे प्रकार… https://t.co/Cq9rw8Up9K
— Supriya Sule (@supriya_sule) January 12, 2024
रुग्णालयाचे डीन डॉ, शिवाजी सुक्रे यांनी माध्यमांना सांगितले की, या हाणामारी प्रकरणाती दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी माहिती देखील सुप्रिया ताई सुळे यांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
