'चित्रा सिनेमा' आज घेणार रसिकांचा कायमचा निरोप; SOTY 2 सिनेमाचा शो ठरणार शेवटचा
Chitra (Photo Credits: Instagram)

मुंबईमध्ये हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच सिंगल स्क्रिन थिएटर्स आहेत. त्यापैकी दादर पूर्व भागातील 'चित्रा सिनेमा' (Chitra Cinema) आज बंद होणार आहे. SOTY 2 सिनेमाचा शो आज या थिएटरमधील शेवटचा शो ठरणार आहे. मागील सात दशकांपासून चित्रा टॉकीजमध्ये मराठी,हिंदी सिनेमे झळकत आहेत. मात्र आज हे थिएटर कलाकारांसोबतच रसिकांचाही निरोप घेणार आहे.

550 आसनक्षमतेचं चित्रा थिएटर काही वर्षांपासून रिन्युएट करण्यात आलं होतं. मात्र अपेक्षित व्यवसाय आणि उत्पन्न होत नसल्याने आता मुंबईतील अजून एक सिंगल स्क्रिन थिएटर बंद होत आहे. पी.डी मेहता यांचचा मुलगा दारा मेहता हे थिएटर सांभाळत होता. एकेकाळी बॉलिवूडच्या सिनेमांसाठी रसिकांनी रांगा लावून सिनेमाची तिकीटं काढली होती.

आता ऑनलाईन स्ट्रिमिंगमुळे प्रेक्षकांना अनेक पर्याय खुले झाले आहेत त्यामुळे सिंगल स्क्रिनकडे रसिकांनी पाठ फिरवली आहे.