पॉर्न वेबसाईट्सवर (Porn Website) केंद्र सरकारने जरी बंदी घातली असली तरी, त्याला आळा मुळीच बसला नाही. या ना त्या मार्गांनी पॉर्न (Porn) आपले हातपाय पसरत आहेच. अमेरिकेने भारताकडे चाईल्ड पॉर्नसंबंधी नुकतीच एक आकडेवारी सोपवली आहे. या आकडेवारीवर नजर टाकता ती धक्कादायक असल्याचे लक्षात येते. इतकी की केवळ पाच महिन्यांत तब्बल 25 हजार पॉर्न व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आले आहे. त्यातील तब्बल 500 प्रकरणं ही केवळ मुंबई शहरातील आहेत. अमेरिकेच्या नॅशनन सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) या संस्थेने ही आकडेवारी भारताच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (National Crime Records Bureau) विभागाकडे सोपवली आहे. उभय देशांमध्ये हा डेटा (Porn Data) शेअर करण्याबाबत गेल्या वर्षी करार झाला होता. त्यानुसाह हा डेटा शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, लगान मुलांवरील लैंगिक अत्याचार, चाईल्ड पॉर्नोग्राफी (Child Pornography) इंटरनेटवर अपलोड करण्यात राजधानी दिल्ली सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांचाही या यादीत समावेश आढळतो. अद्याप राज्यनिहाय आकडेवारी पुढे आली नाही. मात्र, ती धक्कादायक असल्याचे समजते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत या वृत्ता म्हटले आहे की, राज्यातील सुमारे 1700 प्रकरणं सायबर युनिटकडे सोपवीली आहेत. (हेही वाचा, पॉर्न बघण्याचे व्यसन लागले तर होऊ शकतात अनेक त्रास; जाणून घ्या या बद्दल अधिक माहिती)
धक्कादायक असे की, राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये तब्बल 500 प्रकरणं पुढे आली आहेत. यातील काही प्रकरणांबाबत एफआयआर दाखल झाला आहे. उर्वरीत प्रकरणांवर लवकरच एफआयआर दाखल होऊ शकतो. दरम्यान, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो कडे प्राप्त झालेला डेटा हा विविध शहरांकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकरणांची दखल घेऊन कारवाई केली जाणार असल्याचे समजते.