Pune News: पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरातील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत एकाच कुटूंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे यात होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. या घटनेची संपुर्ण तपासणी केल्यानंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
या घनटेमुळे परिसरात शोक पसरला आहे. ही आग ३० ऑगस्टच्या पहाटचे पाचच्या सुमारास लागल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच, त्यानंतर महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यात महावितरणकडून दुकानात लावलेल्या मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत असल्याचे तसेच वीजमीटर व सर्व्हिस वायर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
ही आग इतकी होती की, आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटूंब राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटूंबातील पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, हार्डवेअरच्या दुकानाला पहाटे सुमारास आग लागली. दुकानात ऑईल पेंट असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. याच पेंटच्या आगीने दुकानात वायू निर्माण झाला. आग आग आणि वायू यात गुदमरुन पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला