Shiv Sena: एकच थापड देऊ, पुन्हा कधी उठणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून थेट इशारा
Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची दखल घेत थेट इशारा दिला आहे. 'आतापर्यंत टीका ऐकण्याची खूप सवय झाली आहे. कौतुक झालं की भीती वाटते. त्या एका चित्रपटातील डायलॉग प्रमाणे थप्पडसे डर नही लगता.... अशा अनेक थापडा घेत आणि देत आलो आहे. जेवढ्या खाल्ल्या त्यापेक्षाही अधिक दिल्या आहेत यापुढेही देऊ. एखदा अशी थापड देऊ, पुन्हा कधी उठणार नाही', अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आणि गेली अनेक वर्षे रखडलेल्या बीडीडी चाळ (BDD Chawls) पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींच्या पुनर्वसन बांधकामाचे आज (1 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी 'वेळ आल्यास शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) फोडू', असे वक्तव्य केले होते. लाड यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही थेट शब्दात आज इशारा दिला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की मी मुख्यमंत्री असताना अशा एका चांगल्या कार्याची माझ्याहस्ते सुरुवात होईल. या कार्यक्रमासाठी येताना चाळीतील लोक माझ्यावर फुलं उधळंत होते. पण, खरं तर या चाळकऱ्यांचेच आपल्यावर प्रचंड ऋण आहेत. आज आपण चाळीचा टॉवर करतो आहे. पण या चाळीतील लोकांनी जे आपल्याला दिलं त्याचं ऋण आपण कशातूनच फेडू शकत नाही. चाळीला मोठा इतिहास आहे. इतिहासाची पाळंमुळं रुजली आहेत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे सांगणारे टीळक म्हणले. त्यामुळे स्वराज्यात हक्काचं घर असायला. तेच आम्ही करतो आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा, BDD Chawls Redevelopment: माजी मुख्यमंत्र्यांनी घाईघाईत नारळ फोडला; आदित्य ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला)

ट्विट

दरम्यान, या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय फटकारेही ओढले. कार्यक्रमादरम्यान सतेज पाटील यांनी डबल सीट चित्रपटाचा उल्लेख केला होता. हाच धाका पकडत उद्धव ठाकरे म्हणाले 'आपलं सरकार हे ट्रीपल सीटआहे. हे मुद्दामहूनच बोलतो आहे. त्याचं कारण असं की आजवर केवळ टीकाच ऐकत आलो आहे. कोणी कौतुक केलं की भीती वाटायला लागते. त्यामुळे तो चित्रपटातील डायलॉग आहे ना 'थप्पड से डर नही लगता' तसं... थप्पड से डर नही लगता. आजवर अशा अनेक थपडा खात आणि देत आलो आहे. जेवढ्या खाल्ल्या त्यापेक्षा अधिक दिल्या आहेत. त्यामळे एखाद्या दिवशी अशी थापड देऊन, पुन्हा उठणार नाही', अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केली. लढवय्या हा शिवसेनेचा गुण आहे, अशी आठवण सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसाद लाड यांच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला.