मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; पण आता आणखी कसोटी, गाफील राहू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुबंईमध्ये (Mumbai) आढळून आले होते. मात्र, मुंबई शहराने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मुंबई महानगरपालिकेचे कौतूकही करण्यात आले होते. मुंबईतील कोविड19 चा प्रतिबंध तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला आढावा. मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक, पण आता आणखी कसोटी आहे. गाफील न राहता कोरोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क करा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

मुंबईची परिस्थिती तुम्ही सर्वांनी अहोरात्र मेहनतीने काबूत ठेवली आहे. या कामाची दखल डब्लूएचओ आणि वाँश्गिटन पोस्टने घेतली आहे. आपण कोणतीही माहिती लपवत नाही, याचे कौतूक वाँश्गिटन पोस्टने केले. या कौतुकास्पद परिस्थितीतही आता आपली कसोटी आहे. जगभर जे निरीक्षण आहे, त्यामध्ये आता दुसरी लाट येईल असे म्हटले जाते. तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसीस यांना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली. जिथे रुग्ण आढळून येतात, तेथे एकत्रित जाऊन डासांची उत्पुत्ती रोखण्यासाठी उपाय योजनांवर भर देण्यात येत असल्याची तसेच 224 प्रभागात फवारणी सुरु आहे. टाक्यांच्या निर्जंतुकीकरणावर भर देण्यात येत आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. याशिवाय मुंबईतील गणेशोत्सव त्यातील सार्वजनिक तसेच कौटुंबिक उत्सव, गणेशाचे आगमन आणि विसर्जन व्यवस्था तसेच कोकणात गणेशोत्सवासाठी जाऊन येणारे नागरिक यांच्यापर्यंत मार्गदर्शक सूचना, वस्तूस्थितीची माहिती वेळेत पोहचविण्यात यावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.हे देखील वाचा- 'सीएम उद्धव ठाकरे यांना श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करा'; शिवेसेना आमदार प्रताप सरनाईक यांची रामजन्मभुमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला विनंती

ट्वीट-

या बैठकीत परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापालिकेचे आयुक्त आय. एस चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, संजीय जयस्वाल, पी. वेलारसू, सुरेश काकाणी, उपायुक्त तसेच वॉर्डनिहाय सहायक आयुक्त विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच वैद्यकीय तसेच आरोग्य यंत्रणांचे प्रमुख, काही रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.