
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) पक्षाचा झेंडा बदलला असून आपल्या विचारधरेतही बदल केला आहे. यामुळे पाकिस्तानी आणि बांगलादेशी खुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 9 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढणार आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतात शिरलेल्या घुसखोरांना हाकलण्याची भुमिका ही बाळासाहेबांची आहे. याचे कोणीही श्रेय घेऊ नये, असे उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसेवर टीका केली आहे. यावर मनसेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे 23 जानेवारी रोजी पहिले राज्यव्यापी अधिवेशन मुंबई येथे पार पडले होते. दरम्यान, मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल केला असून पुढील काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मनसे पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. यातच सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखातीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलावेच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहात का? असा पश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, घुसखोरांना हाकला ही भुमिका बाळासाहेबांनी गेल्या अनेक वर्षापूर्वी सर्वांसमोर मांडली होती. यामुळे आम्ही आमच्या भुमिकेवर ठाम आहोत. तसेच कोणीही याचे श्रेय घेऊ नये, असे विधान करत उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे देखील वाचा- यवतमाळ: विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव; महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवारी 9 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता मनसेचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा निघणार आहे. यासाठी मनसेकडून जोरदार जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरून मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे.