मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार: पाहा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कोणाची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत
CM Uddhav Thackeray Cabinet Expansion | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) उद्या (मंगळवार, 24 डिसेंबर 2019) पार पडण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी तशा बातम्याही दिल्या आहेत. दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमिवर शिवेसना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), राष्ट्रीय काँग्रेस (National Congress) अशा तिन्ही पक्षांच्या अनेक चेहऱ्यांची संभाव्य मंत्री म्हणून चर्चा सुरु आहे. यात नवनिर्वाचीत आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यापासून अजित पवार (Ajit Pawar) ते विजय वडेट्टीवार (Vijay Namdevrao Wadettiwar यांच्यासह विविध नावांची चर्चा आहे. या चर्चित नावांवर टाकलेली ही एक नजर.

शिवसेना

आदित्य ठाकरे, मनीषा कायंदे, दिवाकर रावते, अनिल परब, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत , दादा भुसे, गुलबाराव पाटील, तानाजी सावंत, संजय शिरसाट, बच्चूक कडू, आशिष जैस्वाल, शंकरराव गडाख, अनिल बाबर, शंभूराज देसाई

राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, हसन मुश्रीफ

राष्ट्रीय काँग्रेस

विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमख, के.सी. पडवी, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम, सतेज पाटील, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळ विस्तार उद्या करण्याची शक्यता; पाहा कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं?)

दरम्यान, शिवाजी पार्क येथील मैदानावर पार पडलेल्या शपथविधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस- जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे वरील नावे ही या सहा मंत्र्यांची नावे गृहीत धरुन दिली आहेत.