Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरामध्ये एका उच्च शिक्षित तरूणाने आत्महत्या केली आहे. उच्च शिक्षित तरूणाने ज्यूसमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकून आत्महत्या केली अअहे. ही घटना शुक्रवार 14 दिवशीची आहे. दुपारी दीड च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. दरम्यान आत्महत्या करणारा तरूण मेडिकल डिस्ट्रिब्यूटर म्हणून काम करत होता. आर्थिक स्थिती तंग असल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा केवळ पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आर्थिक विवंचनेतून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणारा हा तरूण केवळ 33 वर्षांचा होता. राहुल मोहन पाराशर असं त्याचं नाव होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल पाराशर छत्रपती संभाजी नगर मध्ये नागेश्वरवाडी भागात तनिषा नावाचे दुकान चालवत होता. शहरात तो औषध विक्रेत्यांना औषध पुरवत होता. शुक्रवारी राहुलने दुपारच्या सुमारास दुकानात असताना ज्यूसमध्ये उंदीर मारण्याचे अल्युमिनियम फॉस्फेट हे औषध टाकून ते प्यायला. यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले.

राहुलने आत्महत्या केल्याचा हा सर्व प्रकार त्याच्या मित्राच्या लक्षात येताच त्याने उपचारासाठी राहुलला खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी देखील त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यू झाला. नक्की वाचा: Mumbai Shocker: 6 महिन्यांचा थकीत पगार देण्याचा तगादा लावला म्हणून मुंडण करून विवस्त्र धिंड काढत छळलेल्या तरूणाची आत्महत्या .

क्रांती चौक पोलीस ठाण्यात राहुल पाराशरच्या मृत्यूची नोंद ही आकस्मिक मृत्यूची नोंद अशी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.