Chhagan Bhujbal: मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
Chhagan Bhujbal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Resevation) ओबीसी नेत्यांनी (OBC Leader) आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण अध्यादेशानंतर पहिल्यांदाच ओबीसींचा महा एल्गार (Maha Elgar) मेळावा आज अहमदनगरमध्ये पार पडत आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी आपण 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे. ( Maratha Quota: 'बुधवारपासून मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण'; मनोज जरंगे-पाटील यांचा सरकारला इशारा)

पाहा व्हिडिओ -

छगन भुजबळ म्हणाले की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन  छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

"आम्हाला आरक्षण मिळाले म्हणून गुलाल उधळला मग उपोषण कशाला करता. कागद आला आणि हा म्हणतो अध्यादेश आला. मसुदा आणि अध्यादेश यातला फरक कळत नाही. महाराष्ट्रामध्ये उन्माद केला जातोय ओबीसी लोकांना त्रास दिला जातोय. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र ते वेगळं द्या.." असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.