Chemical Leak Pune | (Photo Credits: ANI)

पुणे (Pune) येथील गरवारे कॉलेज (Garware College) परीसरातल सेंट्रल मॉल (Central Mall) परिसरात आज (29 मार्च) नागरिक आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. सेंट्रल मॉल पार्किंगमध्ये अचानक गॅसगळती (Chemical Leak) झाल्याचे ध्यानात आले. तळघरातून येणाऱ्या रसायनाच्या उग्र वास आणि धुरामुळे उपस्थितांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि डोळ्यातून पाणीही येऊ लागले. हा प्रकार गॅसगळतीचा असल्याचे ध्यानात आल्याने मग लागलीच अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाने तातडीने दाखल होत पाण्याचा मारा केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि धोका टळला.

अग्निशामक दलाच्य एरंडवणा, कोथरुड येथील अधिकारी, कर्मचारी दोन गाड्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षीतपणे कामगिरी करत पाण्याचा मारा केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. परिस्थिती नियंत्रणातआल्यानंतर जवानांनी ऑक्सिजन सिलेंड आणि विषारी वायू रोधक सूट परिधान केला आणि प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. तेव्हा मॉलच्या तळघरात एक विशिष्ट प्रकारची पांढरी पावडर आढळून आली. या पावडरमधूनच उग्र वास बाहेर पडत होता. ज्यामुळे लोकांना डोळ्यांना आणि श्वसनास त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले. हे रसायन नेमके काय आहे हे मात्र समजू शकले नाही. (हेही वाचा, Pune Fire: पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग)

दरम्यान, विरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले, हा कोणताही अनुचीत प्रकार नाही. मॉलमध्ये स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरमधून उग्र वास आला असण्याची शक्यता आहे. ही पावडर नेमकी कसली आहे याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तळघराच्या खिडक्या उघडून हवा खेळती राहिल असा प्रयत्न केला. परंतू, वास अधिकच उग्र होऊन पसरु लागला. त्यामुळे खिडक्या बंद करुन पुन्हा पाण्याचा मारा केला. त्यानंतर वास कमी झाला.