
मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. मात्र महिलांसाठी ही सुरक्षित नसल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकावर एक माथेफिरू गर्दीचा फायदा घेत महिलांवर केमिकल फेकत असल्याचे वृत्त समोर आले आहे. या केमिकल हल्ल्यामुळे अंधेरी स्थानकामध्ये (Andheri Station) महिला प्रवाशात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
अंधेरी स्थानकामध्ये एका माथेफिरू तरूणाने मागील काही दिवसांमध्ये अंदाजे 8 महिलांवर केमिकल हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये वापरण्यात येणार्या पदार्थामुळे महिलांना त्वचेवर जळजळ, कपडे जळल्याचे समोर आले होते. यानंतर निर्भया पथकाने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. हा तरूण माथेफिरू असल्याचं म्हटलं जात आहे.
केमिकल हल्ला ज्या परिसरात केला जात होता तेथे सीसीटीव्ही नसल्याने त्याची ओळख पटवण्याचं आव्हान आहे. मात्र सध्या महिला प्रवाशांसह निर्भया पथकाने कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे.