Chaos Erupts Near Saptashrungi Shrine (PC - Twitter)

Chaos Erupts Near Saptashrungi Shrine: गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक अधिकाऱ्यांना अपयश आल्याने नाशिकमधील प्रसिद्ध सप्तशृंगी मंदिरात (Saptashrungi Temple) रविवारी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. कोविड-19 चे निर्बंध असूनही, पवित्र नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी महासप्तमीच्या विशेष प्रसंगी एक लाखाहून अधिक भाविक मंदिरात आले त्यामुळे याठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

डोंगरावर असलेल्या मंदिरात नेणाऱ्या बसमध्ये चढण्यासाठी लोक एकमेकांना ढकलताना दिसत होते. काही जण तर वाहनांच्या छतावर चढून त्याच्या खिडक्यांमधून आत शिरले. पुरेश्या बससेवा नसल्याने संतप्त झालेल्या भाविकांनी खिडक्या तोडून बसची तोडफोडही केली. (हेही वाचा - Tiger Viral Video: वर्धेत भररस्त्यावर जंगल सफारीचा थरार, रोडवर पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार)

लहान मुले, महिला आणि वृद्ध मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना त्रासलेले दिसत होते. योग्य व्यवस्थापनाअभावी संताप व्यक्त करत अनेकांनी रस्त्यावर बसून धरणे आंदोलनही केले. येथील परिस्थितीबद्दल बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही व्यक्त केलेल्या भाविकांच्या संख्येपेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी आले. त्यामुळे थोडा गोंधळ उडाला. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी भाविकांना थेट मंदिरात घेऊन जाणाऱ्या लिफ्टसाठी तिकीट काउंटरजवळ बॅरिकेड्स लावले होते.

मनसे सुप्रीमो राज ठाकरे यांनीही रविवारी सप्तशृंगी तीर्थाचे दर्शन घेतले. मंदिरातील अनेक भाविक त्यांना त्यांच्यामध्ये पाहून बेभान झाले. महासप्तमीनिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी ते मंदिरात गेले होते. नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेले सप्तशृंगी मंदिर हे राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. दरवर्षी, सात पर्वत शिखरांमध्ये वास करणाऱ्या सप्तशृंगी निवासिनी देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिराला भेट देत असतात.