चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून शरद पवार यांच्यावर टिका; म्हणाले, शरद पवारांची ही शेवटची धडपड
chandrashekhar bavankule and sharad pawar (फोटो- फेसबूक, पीटीआय)

उर्जा मंत्री तथा पालक मंत्री चंद्रशेखर (Chandrashekhar Bavankule) यांचा जिल्हाधिकारी कार्यलयाच्या सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. दरम्यान चंद्रशेखर यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला होता. चंद्रशेखर यांनी या प्रश्नाचे उत्तर देत शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. माणूस जेव्हा संपतो तेव्हा शरिरात काही धडपड तयार होते. तसेच शरद पवारांची ही शेवटची धडपड आहे, असे ते म्हणाले.

शरद पावर यांनी शुक्रवारी सोलापूर ( Solapur) येथे पत्रकार परिषद घेतली होती. दरम्यान, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांवर शरद पवार भडकले होते. याची संधी साधत चंद्रशेखर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. "पत्रकारांवर भडकून लोकशाही चालत नाही . प्रसार माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. पत्रकारांवर भडकून रोष काढून लोकशाही चालत नाही. पवारांकडून असे अपेक्षित नाही. तसेच माणूस जेव्हा संपतो, तेव्हा त्याच्या शरीरात धडपड तयार होते. ही शरद पवारांची शेवटची धडपड आहे." असे बावनकुळे म्हणाले. हे देखील वाचा-राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

यामुळे शदर पवार भडकले

राष्ट्रवादीचे (Rashtrawadi Congress) अनेक मोठे नेते पक्षाला रामराम करत भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या यादीत राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह मोहिते पाटील (padamsinh Mohite patil) यांचाही समावेश आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शरद पवार यांना "नेते पक्ष सोडत आहेत, मात्र नातेवाईकही दूर जात आहते," असा प्रश्न विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले की, "अशा लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही. यांना बोलवणार असाल तर, मला बोलावू नका. आपण गेलात तर बरे होईल."