चंद्रपूर (Chandrapur) येथे एक महिला घराच्या अंगणात रात्रीच्या वेळेस झोपल्या असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच बिबट्याने या महिलेला ओढत जंगलात नेले असल्याची बाब सुद्धा समोर आली आहे. या प्रकरणी महिलेचा मृत्यू झाला आहे.
गयाबाई हटकर असे मृत महिलेचे नाव आहे. गयाबाई रात्री अंगणात झोपल्या असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. तर सकाळी त्या अंगणात दिसल्या नाही म्हणून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. त्यावेळी गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने शोधाशोध सुरु केली असता त्यांना शरीराचे काही तुकडे दिसून आले. त्यानुसार पुढील शोध घेतला असता गयाबाई यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. तसेच बिबट्याने त्यांना 500 किमी फरफटत नेले असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
(चंद्रपूर मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा)
तर दोन दिवसांपूर्वीच बिबट्याने एका नऊ वर्षाच्या मुलावर सुद्धा हल्ला केला होता. मात्र त्यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. तर पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्यानंतर गावात बिबट्यांचा वावर सुरु असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.