Leopard | Representational image (Photo credits: Wikimedia Commons)

चंद्रपूर: सिंदेवाही (Sindevahi)  तालुक्यातील गडबोरी या छोटेखानी गावात एका बिबट्याच्या हल्ल्यात 9 महिन्याच्या चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागली आहेत. स्वराज गुरुनुले (Swaraj Gurunule)  असे मृत बालकाचे नाव असून त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सोबतच अचानक गावातील वस्तीत शिरून बिबट्याने हल्ला केल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र्र टाइम्सच्या वृत्तानुसार स्वराज हा अवघा 9  महिन्याचा चिमुकला घरातील एका खोलीत झोपला होता इतक्यात गावाशेजारील जंगलातून आलेल्या बिबट्याने सर्वांच्यानकळत त्याला घरातून उचलून नेले. काही वेळाने स्वराज कुठेच दिसत नसल्याने घाबरलेल्या गुरुनुले कुटुंबाने शोशोध सुरु केली. पण दुर्दैवाने त्यांना त्याच्च्या बाळाऐवजी त्याचा मृतदेह गावाजवळच्या झाडीत सापडला. यानंतर कुटुंबाने केलेला आक्रोश पाहून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. सोबतच हा गावकऱ्यांच्या सुरक्षेवरील प्रश्न असल्याने लवकरात लवकर बिबट्याचा शोध घेऊन जंगलात योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांकडून केली जात आहे. पुणे: 18 महिन्याच्या बाळाला वाचवण्यासाठी आईने केला बिबट्याशी सामना

बिबट्याच्या किंवा प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही यापूर्वी देखील चंद्रपूर जिल्ह्यातील संघारामगिरी (रामदेगी) येथे ध्यानस्थ बसलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला होता. ही घटना गेल्या डिसेंबरमध्ये घडली होती. त्याच प्रमाणे त्यापूर्वी एक महिना आधी नोव्हेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात असलेल्या पोवनपार येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेला होता. दरम्यान गावकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असा इशारा पोलिसांकडून देण्यात येत आहे.