चंद्रपूर: लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक संभोगाला बळी पडलेल्या मुलाने वसतिगृहात लावून घेतला गळफास; सुसाईड नोट मध्ये लागला तपास
Representational Image (Photo Credits: File Image)

चंद्रपूर (Chandrapur) येथील एका 12 वीत शिकणाऱ्या मुलाने सेवा दल वसतिगृहात (Seva Dal Hostel)  गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे, या  मुलाच्या मृत्युसोबतच त्यामागील कारण देखील तुटकेच हादरवून टाकणारे आहे. मागील काही दिवसांपासून वसतिगृहातील काही मुले या मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होती, काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलासोबत अनैसर्गीक पद्धतीने संभोग सुद्धा केला. या प्रकरणाने भांबावून गेलेल्या मुलाने अखेरीस मानसिक तणाव आणि रजचा त्रास सहन न झाल्याने 18 जानेवारी रोजी वसतिगृहातील पंख्याला गळफास लावून आपला जीव सोडला. याबाबत चंद्रपूर पोलिसांना (Chandrapur Police) मुलाने लिहून ठेवलेल्या 18 पानी सुसाईड नोट मधून माहिती मिळाली आहे. मुंबई: टॅक्सी चालकावर बलात्कार करणाऱ्या आरपीएफ कर्मचारी अमित धनकड याला अटक

प्राप्त माहितीनुसार, मुलाच्या मृत्यू नंतर वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना बोलावून घेतले यावेळी मुलाच्या खोलीत पोलिसांना ही 18 पानांची सुसाईड नोट सापडली. यामध्ये मुलाने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत सविस्तर माहिती दिली होती. या स्पष्ट पुराव्यांनंतर पॊलिसांनी वसतिगृहंतील संबंधित आरोपी म्हणजेच 14 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणाबाबत माहिती असूनही लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली वसतिगृहाच्या वॉचमॅन ला सुद्धा ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलीस या सुसाईड नोटचा अधिक तपास करत असून संबंधित आरोपींवर इंडियन पीनल कोड व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.