Taxi Driver | (Photo Credit: Archived, edited, representative images)

रेल्वे सुरक्षा दल (Railway Protection Force) कर्मचारी अमित धनकड (Amit Dhanakad) याला पोलिसांनी अटक केली आहे. अमित धनकड याच्यावर टॅक्सी चालकाशी अनैसर्गिक संभोग (Unnatural Sex)  केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 11 जानेवारी रोजी घडले होते. पीडित टॅक्सी चालकावर बलात्कार केल्यावर अमित धनकड हा त्याला घटनास्थळी सोडून पसार झाला होता. त्यानंतर पीडित टॅक्सी चालकाने पोलिसांमध्ये तक्रार केल्यावर हे प्रकरण पुढे आले होते.

प्राप्त माहितीनुसार, सीआपीएफ कर्मचारी अमित धनकड हा आपले कर्तव्य (ड्युटी) संपल्यावर घरी निघाला होता. आपल्या कार्यलयातून बाहेर पडल्यावर तो मुंबई शहरातील डिमेले रोड येथे थांबला होता. दरम्यान, त्याने एका टॅक्सी चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. चालकाने गाडी थांबवल्यावर अमित याने त्यास ग्रँट रोडला घेऊन जाण्याचा आग्रह केला. मात्र, टॅक्सी चालकाने त्यास नकार दिला. टॅक्सी चालकाचा नकार पाहून संतप्त झालेल्या अमित धनकड त्याला जवळच्या रेल्वे मार्गानजिक असलेल्या जागेत घेऊन गेला. (हेही वाचा, अमरावती: प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने भिरकावला दगड; पीडिताच्या आईची पोलिसात धाव; रक्तबंबाळ तरुणावर ICU मध्ये उपचार)

पीडित टॅक्सी चालकाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ग्रँड रोड येथे जाण्यास नकार दिल्यावर आरोपी अमित धनकड हा त्याला (टॅक्सीचालक) घेऊन डिमेले रोड येथील रेल्वेमार्गानजिक घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोग (Unnatural Sex with Taxi Driver)  केला. आरोपीने या वेळी टॅक्सीचालकाजवळचे पैसे आणि गाडीच्या चाव्या घेऊन पोबारा केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन थेट पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दिली.