एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाच्या वेळी खडसे यांनी एक वक्तव्य केले होते. जर तुम्ही माझ्यामागे ईडी (ED) लावलीत तर मी तुमची सीडी लावेन, असे ते म्हणाले होते. खडसेंच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आपली प्रतिक्रिया दिली आहे. ईडी ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो आणि प्रश्न सीडी लावण्याचा...तुम्ही खुशाल लावा, तुम्हाला कोणी रोखले आहे? असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांना ईडीच्या नोटीस आल्या आहेत. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. याचपार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. तसेच येत्या 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. याच मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ईडी ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो. भाजप ईडी मागे लावते, असे त्यांना वाटते का? ईडीची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि राहिला प्रश्न सीडी लावण्याचा तर, तुम्ही खुशाल साडी लावा. तुम्हाला कोणी रोखले आहे?”, असे चंद्रकात पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Eknath Khadse On ED Notice: नोटीस मिळाली, 30 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहणार- एकनाथ खडसे
"भोसरी येथील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने मला नोटीस बजावली आहे. मला ही नोटीस आज मिळाली आहे. मला मुंबईत बुधवारी चौकशीला बोलावण्यात आले आहे. या चौकशीला मी सामोरा जाणार आहे. तसेच ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे", असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे.